धाराशिव (जिमाका) – ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी 2021 व 2022 मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या 910 ग्रंथांबाबत काही सुचना, हरकती व आक्षेप असल्यास मागविण्यात आले आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2021 व 2022 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीच्या सदस्यांनी निवड केलेल्या 910 ग्रंथांची यादी त्यामध्ये मराठी 885, हिंदी 208, इंग्रजी 221 पुस्तके तसेच, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या नियोजन समितीने घेतलेल्या निर्णयानुसार दर्जेदार व पुरस्कार प्राप्न 63 मराठी ग्रंथांची यादी उच्च च तंत्रशिक्षण विभागाच्या https://htedu.maharashtra.gov.in/Main/ या संकेतस्थळावर 30 मार्चपर्यंत अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे.
या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 30 टक्के सूट दराने वा त्यापेक्षा अधिक सूट दर देण्यास तयार असल्यास त्या सूट दराप्रमाणे ग्रंथांचा पुरवठा करणे आवश्यक राहील.याबाबत प्रकाशक, वितरक यांना देयकात स्पष्टपणे नमूद करावे लागेल.
या संदर्भाने यादीतील कोणत्याही ग्रंथांबाबतत सूचना,हरकती,आक्षेप असल्यास दि. 30 मार्च पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन, मुंबई -01 यांच्याकडे लेखी स्वरुपात समक्ष वा पोस्टाने अथवा ई-मेलवर पाठवावे. या मुदतीनंतर प्राप्त सुचना, हरकती, आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांना कळविले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी