August 9, 2025

पोलिस अधीक्षक यांच्या सकंल्पतेला गुन्हे मुक्त गाव अभियानास ग्रामीण भागातुन मिळतोय प्रतिसाद

  • करजखेडा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पतेतुन गुन्हे मुक्त गाव हे अभियान जिल्हाभर ग्रामीण भागातही राबवण्यात येत आहे ग्रामीण भागातील समस्या, तंटे, आरोग्य , कृषी सबंधीत प्रश्न गावातच मिटावे सर्वांनी सुख समाधानाने जीवन जगावे, यासाठी हे अभियान संपुर्ण गावोगावीही पोलिस प्रशासन पथक, आर्ट ऑफ लिव्हींगचे आरोग्यदायी पथक आदी यासाठी उपस्थित होते.
  • धाराशिव तालुक्यातील करजखेडा खंडोबा मंदिर सभागृहात शनिवारी दि. ( २३ ) रोजी सकाळी मार्गदर्शन, समस्याचे निराकारण करण्यासाठी पोहचले. यावेळी सर्वप्रथम पोलिस मुख्यालयाचे आर.पी.आय दुबे यांनी उपस्थितांना संबोधीत करताना सर्व समाज बाधंवांनी एकोप्याने राहावे, वादविवादापासुन दुर राहावे, सर्वांनी आनंदमय जीवन जगावे असे सांगितले. तर बेंबळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश पाटील यांनीही गावातील समस्या, तंटे अशा स्वरूपाक्या समस्या गाव पातळीवर प्रतिष्ठीत माणसांना घेऊन मिटवावे. यामुळे फुजुल होणाऱ्या आर्थिक समस्यांना तोंड दयावे लागणार नाही व कुटुंब सुंदर जगेल असेही त्यांनी सांगितले.

( गुन्हे मुक्त गाव अभियानास उपस्थित बेंबळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश पाटील, नंदुभैय्या ताबळे,सरपंच सुधीर भोसले,अनंत आदटराव,तानाजी शिंदे आदी.)

  • यानंतर आरोग्यदायी समस्यासाठी आर्ट ऑफ लिव्हीगचे नंदुभैय्या ताबळे, पोलिस प्रशासन बेंबळी पोलीस ठाण्याचे बीट अमलदार संजय नायकल, श्रीमती ए.बी. मुंडे,पी.बी.मुंडे,पोलिस ड्रायव्हर शेख यांनी ह्या कार्यक्रम राबविण्यासाठी मोठे परीश्रम घेतले. रुद्राक्ष थेरपी याची माहिती दिली गावातील नागरिकांना दिली व गरजूंना तसेच उपस्थितांना या थेरपीचा उपचार आर्ट ऑफ लिव्हीगचे नंदुभैय्या ताबळे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ समाधानी झाले.
  • यावेळी करजखेडा गावचे सरपंच सुधीर भोसले, पोलीस पाटील अनंत आदटराव, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी शिंदे, माजी संचालक हारीदास कळसुले, दगडु भोसले, उद्घाव कळसुले, बलभीम भोसले, माजी सैनिक तथा सेवानिवृत्त पोलिस राजेंद्र भंडारकर , पत्रकार बालाजी लोखंडे, माजी सैनिक बाळासाहेब कळसुले,लिंबराज सांळुके , गोविंद गरड,राजेंद्र शिंदे यासह गावातील पुरुष, महिला व युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
error: Content is protected !!