August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 239 कारवाया करुन 1,74,550 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल गुरुवार दि.21.03.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 08 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 500 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 100 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 184 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य व कार जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,09,990 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 08 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)कळंब पो.ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-आबा उत्तम काळे, वय 35 वर्षे, रा. महादेव नगर कोठळवाडी, ता. कळंब जि. धाराशिव हे 12.10 वा. सु. ईटकुर येथे ईटकुर ते कळंब जाणाऱ्या रोडच्या बाजूला आरोपीच्या पत्राच्या शेडसमोर अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- शिवाजी रामभाउ तांबारे, वय 40 वर्षे, रा. अंदोरा ता. कळंब जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. कळंब येरमाळा जाणारे रोडलगत तुळजाभवानी रसवंतीग्रहाचे पाठीमागील बाजूस अंदाजे 720 ₹ किंमतीची 12 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 2)परंडा पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राणी पोपट पवार, वय 27 वर्षे, रा. वाकडी, ता. परंडा जि. धाराशिव हे 07.30 वा. सु. वाकडी गावाचे कडेला पत्राचे शेडमध्ये अंदाजे 75,000 ₹ किंमतीच्या 500 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले.
  • 3)धाराशिव ग्रामीण पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-बापु भगवान पवार, वय 43 वर्षे, रा. वरुडा पारधी पिडी, ता. जि धाराशिव ह.मु. उपळा ता. जि. धाराशिव हे 12.40 वा. सु. उपळा ते तेर जाणारे रोडवर किरण कालीदास पडवळ यांचे शेतात अंदाजे 4,050 ₹ किंमतीची 45 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 4)तामलवाडी पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-भारत लक्ष्मण भालशंकर, वय 52 वर्षे, रा. दहीवडी ता. तुळजापूर जि धाराशिव हे 19.30 वा. सु. दहीवडी येथे आपल्या घराचे बाजूस दहीवडी येथे अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दरुच्या 18 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 5)वाशी पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-नितीन रामेश्वर उकरंडे, वय 29 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि धाराशिव हे 16.00 वा. सु. पार्डी फाटा येथे नॅशनल हायवे क्र 52 रोडचे पुलाखाली अंदाजे 3,24,570 ₹ किंमतीचे देशी विदेशी दरुच्या 146 सिलबंद बाटल्या सह कार क्र एमएच 25 एडब्ल्यु 5402 जप्त करण्यात आले.
  • 6)तुळजापूर पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-अरुण किसन जगताप, वय 72 वर्षे, रा. श्रमजिवी नगर, सोलापूर ह.मु. वडगाव लाख, ता. तुळजापूर जि धाराशिव हे 20.30 वा. सु. वडगाव लाख शिवारात तुळजापूर ते लातुर रोडचे बाजूला त्याचे हॉटेल जवळ अंदाजे 1,440 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 7)ढोकी पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-दत्तात्रय देविदास शिनगारे, वय 47 वर्षे, रा. खामगाव ता.जि. धाराशिव हे 20.10 वा. सु. खामगाव पाटीचे पुढे अंदाजे 800 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.21.03.2024 रोजी 19.50 वा. सु. बेंबळी पो.ठा हद्दीत खंडोबा मंदीर जवळ पक्काभाई पानशॉप च्या बाजूला बेंबळी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- दिपक अशेक वाघुलकर, वय 35 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव हे 19.50 वा. सु. खंडोबा मंदीर जवळ पक्काभाई पानशॅप च्या बाजूला बेंबळी येथे मुंबई मेन मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 780 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)रवि महादेव टकले, वय 24 वर्षे, रा. माळकरंजा ता.कळंब. जि. धाराशिव हे दि.21.03.2024 रोजी 18.03 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन कार क्र एमएच 25 एए 3717 ही आळणी पाटी ते लातुर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द धारशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)रामेश्वर भारत वायकर, वय 27 वर्षे, रा. गोटेगाव ता. केज जि. बीड. हे दि.21.03.2024 रोजी 19.41 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन कार क्र एमएच 25 एस 0014 ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) सोमनाथ कुंडलीक सस्ते, र. कानडी, ता. भुम, 2) चंद्रकांत लोद, 3) बाळु लोद दोघे रा. आंतरगाव, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी 18.00 वा. सु. आंतरगाव गावातील हनुमान मंदीरासमोर फिर्यादी नामे- शशिंकात आत्माराम गोरे, वय 49 वर्षे, रा. आंतरगाव ता. भुम जि. धाराशिव ह.मु. 223 सीएनएस हॉस्पीटल सोलापूर यांना नमुद आरोपींनी आमच्या विरुध्द चोरीची केस करतो का या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन डोळ्यात तिखट टाकून लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शशिंकात गोरे यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 307, 326, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) अशोक महादेव अनभुले, 2) हरिभाउ महादेव अनभुले, 3) बाळासाहेब महादेव अनभुले, 4) श्रीकांत महादेव अनभुले, 5) अनिता पदमसिंह अनभुले, सर्व रा. गोलेगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी 14.00 वा. सु. गोलेगाव येथील शेत गट नं 47 मध्ये फिर्यादी नामे- गोदाबाई जगन्नाथ मस्के, वय 70 वर्षे, रा. आष्टा ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी ज्वारीच्या उभ्‌या पिकात ट्रॅक्टर घालुन 20 ते 25 हजार रुपयाचे नुकसान केल्याने ते विचारण्यास गेल्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन ढकलून दिले. व अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारुन टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी गोदाबाई मस्के यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 143, 147, 149, 427, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मानवी जिवीतहानी धोक्यात येणे सारखे कृत्य करणे व सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)दिनेश मुळे, 2) शशिकांत मुळे, 3) दिपक मुळे सर्व रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.03.2024 रोजी 13.00 वा. सु. सैंदर्या कापड दुकान चे बाजूला इंद्रायनी जनरल स्टोअर्स अणदुर येथे फिर्यादी नामे- तुळशिराम दत्तु धोडके, वय 29 वर्षे, खुदावाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी चार वर्षाचा मुलगा हा फिर्यादीचे मोटरसायकल वरील पाण्याचे जारला धडकून रोडवर खाली पडल्याचे कारणावरुन फिर्यादीचे दुकानात घुसुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच मारहाण केल्यास त्याचा जिव जावू शकतो हे माहित असुनही गळ्यावर पाय ठेवून दाबले, व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तुळशिराम घोडके यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 308, 324, 323, 452, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- यशवंत बलभीम लोंढे, वय 40 वर्ष, रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएम 0659 ही दि. 30.12.2023 रोजी 01.30 ते दि. 31.12.2023 रोजी 05.00 वा. सु. यशवंत लोंढे यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- यशवंत लोंढे यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ अपहरण करणे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- मधुकर नामदेव कवडे, वय 55 वर्षे, रा. बोरामणी ता. द. सोलापूर जि. सोलापूर यांनी आरोपी नामे- 1) एकनाथ, 2) शरद दोघे रा कर्नाटक राज्य यांचे कडून विकत घेतलेल्या मेंढ्याचे पैसे न दिल्याचे कारणावरुन फिर्यादीचा मुलगा नामे मल्लीकर्जुन मधुकर कवडे त्याच्या सोबत दिपक घोडके असे मेंढ्या विकण्यासाठी घेवून जात असताना दि.18.03.2024 रोजी 16.00 वा. सु. बाभळगाव जवळ असलेल्या दुध डेअरी प्रकल्पाजवळ नमुद आरोपींनी पिकअप वाहन थांबवुन वाहनासह मल्लीकार्जुन व दिपक घोडके यांना घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मधुकर कवडे यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 365, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!