August 9, 2025

पोलिस पाटलांनी अवैध दारु विक्रीबाबत माहिती नजिकच्या पोलिस स्टेशनला द्यावी

  • धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. तेंव्हापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोणातून निवडणूक कालावधीत संबंधित विभागातील पोलिस पाटील यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध दारु विक्री होत असल्यास याबाबतची माहिती तात्काळ नजिकच्या पोलिस स्टेशन व संबंधित विभागास कळवावी.तसेच अवैधरित्या दारु विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास सर्वस्वी जबाबदारी पोलिस पाटील यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आदेशित केले आहे.
error: Content is protected !!