August 9, 2025

महासंस्कृती महोत्सवात सहभागी कलावंतांनी संपर्क साधावा – निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती जाधव

धाराशिव (जिमाका) -;सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि जिल्हा प्रशासन, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे 29 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवात जिल्हयातील विविध कलाकारांना त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना देवून पारंपारीक वेशातील कलेची जपणूक व्हावी यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने रंगमंच उपलब्ध करुन दिला होता.विविध कलाकारांनी विविध प्रकारामध्ये आपली कला अतिशय सुंदरपणे सादर केल्या.
ज्या कलाकारांनी या महोत्सवात भाग घेवून आपली कला सादर केली अशा कलाकरांनी महासंस्कृती कार्यक्रमामध्ये ज्या कला प्रकारामध्ये भाग घेतला होता,त्या कला प्रकाराचे नांव व आपले बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोडसह बँकेचे नांव निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक प्रमोद चंदनशिवे यांचेकडे उपलब्ध करुन दयावा.तसेच 9284401932 या व्हॉटसअप मोबाईलवर दोन दिवसात उपलब्ध करुन दयावे.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!