August 9, 2025

उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतांना अवलंबण्याची कार्यपध्दती

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोणातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटार गाड्या/मोटारसायकल/वाहने यांचा समावेश नसावा.
    नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात केवळ पाच व्यक्तीच उपस्थित राहतील. याव्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतांना कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक / सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजचे 6 जूनपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आदेश अंमलात राहतील.
error: Content is protected !!