August 9, 2025

भगतसिंग शाळेत स्वयंशासन दिन,माता पालक मेळावा संपन्न

  • कळंब- माता पालकांनी आपल्या पाल्यावर आवूर्जून प्रेम करा परंतु फाजील लाड करू नका, योग्य तेच संस्कार वेळेवर घाला त्यांच्या कलेगुनानुसर वाव द्या असे प्रतिपादन प्रतिभा गांगुर्डे यांनी स्वयंशासन दिनी केले.
  • शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत गुरूवार (ता.१४) रोजी स्वयंशासन दिन, महिला दीन व माता पालक मेळावा या तिन्ही कार्यक्रमाचे एकत्रित आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रण सम्राट क्रीडा मंडळ संस्थेचे अध्यक्षा मनोरमा शेळके ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा गांगुर्डे, याच शाळेची माजी विद्यार्थिनी डॉ वैष्णवी गिरी तसेच माता पालक संघाच्या अध्यक्षा रविना गायकवाड ह्या होत्या.
  • मनोरमा शेळके म्हणाल्या की, महिला दिनाची सुरुवात कोणी व कधी सुरू झाला याचा इतिहास सांगून समाजातील महिलांना तसेच स्त्री म्हणून समाजात प्रतिष्ठा वाढणे गरजेचे आहे.
  • स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक पद शाळेची विद्यार्थिनी अनुष्का करंजकर हिने भूषाविले. दिवसभर शाळेतील शिक्षकांचे अनुकरण करून अध्यापन कार्य सुरळीत पार पाडले. तदनंतर आयोजित माता पालक व महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या वतीने शिक्षिका वर्षा बन यांचा पालक व विद्यार्थी यांच्याशी केलेला सुसंवाद याचा विचार करता सत्कार करण्यात आला.
  • यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र शेळके यांनी उपस्थित सर्वांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन सतीच बच्छाव तर आभार संगीता करपे यांनी केले. शिक्षिका अनिता याटे, संगीता धुमाळ, मायादेवी सांजेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, माता पालक उपस्थित होते.
error: Content is protected !!