कळंब – कळंब तालुक्यातील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ मधील ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2024 मध्ये पार पडलेल्या निकाल आले असून यामध्ये नगरपरिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहे त्यामध्ये कुमार राहुल महादेव बोंदर इयत्ता पाचवी या विद्यार्थ्याने 300 पैकी 185 गुण,कुमार रणवीर अजय हौसलमल या विद्यार्थ्याने 300 पैकी 178 गुण,कुमार शौर्य सुबोध रणदिवे याने 300 पैकी 143 तसेच कुमार अन्वित अभिजीत हौसलमल याने 300 पैकी 137 गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शालेय समिती व शिक्षक व यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले