कळंब ( महेश फाटक) – कळंब येथील उपजिल्हा रूग्णालयात रूग्ण कल्याण समितीची बैठक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.१५ मार्च २०२४ वार शुक्रवार रोजी पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने कळंब येथील उपजिल्हा रूग्णालयाचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन केल्याबद्दल आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत,सिव्हिल सर्जन डॉ इस्माईल मुल्ला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हारिदास,आर एम ओ डॉ.फुलारी,वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी,तसेच पत्रकार, राजकीय पक्ष कार्यकर्ते, ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न केले त्या सर्वांचे रूग्ण कल्याण समिती मार्फत आभार व्यक्त करुन अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच स्वतंत्र स्री रूग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर व वाढीव जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. १०० खाटां प्रमाणे वाढीव निधी, पदभरती, न प कडे नियमित पाणीपट्टी भरून देखील नियमित पाठपुरावठा होत नसल्यामुळे पेशंटच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून याकडे न प च्या मुख्याधिका-याकडे पाठपुरावा करणे, इ ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी डॉ.नागनाथ धर्माधिकारी, आर एम ओ डॉ फुलारी, रूग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. रामकृष्ण लोंढे,सुशील तिर्थकर, कार्यालयीन अधिक्षक श्रीमती राठोड, मेट्रन श्रीमती कुलकर्णी, डॉ.शरद दशरथ,दत्तप्रसाद हेड्डा, न प आणि तहसील चे प्रतिनिधी हजर होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले