कळंब (अविनाश घोडके ) – मुस्लिम धर्मियांचे पवित्र असा वर्षातील एक महिना येणारा उपवासाचा (रोजा) दि.१२ पासुन सुरु झालेला असुन पहिल्याच दिवशी पहिल्यांदाच कळंब येथील गणेश नगर भागात राहत असलेली दहा वर्षीय सुमारास महंमद मुल्ला हिने पहाटे सहेरी करुन उपवासाचा (रोजा) धरला..
दिवसभर काहीही न खाता पिता सायंकाळी उपवासाचा (रोजा)सोडला याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१० वर्षीय बालकांनी रमजानच्या पवित्र असा एक रोजा (उपवास) पूर्ण केला आहे. मुस्लिम समाजात रमजान या पवित्र सणाला महत्व आहे. त्या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करीत असतात. कुराण व पाच टाईम नमाज पडलाजात असतो.
समाज संस्कृती व संस्कार हे लहानपणी मुलांना दिले तर टीकून रहातात. या धर्माच्या शिकवणीनुसार या दोघांनी अगदी कमी वयात पहिलाच रोजा धरला होता. तो पूर्ण झाल्याने तीचे आई, वडिल मुस्लिम बांधवाकडून, मौलाना, धर्मगुरु, नातेवाईकांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले