August 9, 2025

महाराष्ट्र राज्याच्या जडण घडणीत यशवंतराव चव्हाणांची भूमिका महत्वाची- प्रा.दीपक सूर्यवंशी

  • कळंब (अरविंद शिंदे ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची १११ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी यानिमित्ताने प्रो.डॉ.दीपक सूर्यवंशी (सांस्कृतिक विभाग प्रमुख) यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “राज्याच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच राज्याची भरभराट होऊ शकली, देशामध्ये सर्वच बाबतीमध्ये अग्रेसर आहे”, असे मत मांडले. उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, डॉ.सतीश लोमटे,डॉ.के.डब्ल्यू.पावडे, डॉ.डी.एस.साकोळे, डॉ.श्रीकांत भोसले, प्रा.डॉ.जयवंत ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.राजेश दळवे, प्रा.शाहरुख शेख, प्रबंधक हनुमंत जाधव,श्री बालाजी डिकले, श्री इकबाल शेख, रमेश भालेकर, अरुण मुंडे, उमेश साळुंखे, आदित्य  मडके, रमेश पवार, अर्जुन वाघमारे, प्रकाश गायकवाड, साजिद शेख, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे तसेच उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.दादाराव गुंडरे यांनी मानले.महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!