August 9, 2025

पुरुषांनी स्वातंत्र्य दिल्यामुळेच महिलांचा सन्मान – सौ.शुभांगी पाटील

  • कळंब (राजेंद्र बारगुले) – प्रत्येक स्त्रीला जीवनाच्या प्रत्येक वळणावर कौटुंबिक बंधनात जीवन जगत असतानी आई-वडील,पती,मुलगा आणि सासू-सासरे यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे महिलांचा सन्मान होत असल्याचे प्रतिपादन आमदार पत्नी सौ.शुभांगी कैलास घाडगे पाटील यांनी महिला सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना केले.

  • प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था आयोजित भारत जोडो अभियानाच्या विशेष उपक्रमा अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सौ.सरस्वती महादेव आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली श्री.संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालक आश्रम तांदुळवाडीरोड कळंब येथे महिला सन्मान सोहळा दिनांक १२ मार्च २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता मोठ्या उत्साहात आणि देखणा असा संपन्न झाला.

  • या सोहळ्यात भजनी मंडळातील महिला कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते मायेची शाल, प्रेरणादायी सन्मानपत्र आणि प्रेमाचे प्रतीक असणारे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
    प्रमुख पाहुण्या प्रा.डॉ.वर्षा पंडित जाधव यांनी प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असल्याशिवाय पुरुष यशस्वी होऊ शकत नाही असे उदगार काढले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कळंब शहर महिला अध्यक्षा सौ.धनश्री रुपेश कवडे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्र उभारणीत महिलांचे योगदान सांगून शुभेच्छा दिल्या.

  • संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी महापुरुष,राष्ट्रसंत आणि राष्ट्रमातांच्या योगदानामुळे आपण आज स्वतंत्र असून सध्याच्या परिस्थितीत आपले स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे ते टिकवण्यासाठी भारत जोडो अभियानात भजनी मंडळांनी सहभागी होवून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे असे आवाहन केले.
    या सन्मान सोहळ्याला डिकसळ ग्रामपंचायत माजी सरपंच अनुराधा हरिभाऊ कुंभार,ह.भ.प सुनिता आडसुळ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रस्तावनेतून माधवसिंग राजपूत यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद करून प्रबुद्ध रंगभूमीने महिला कलावंतांचा केलेला सन्मान कौतुकास पात्र असल्याचे सांगितले.

  • ह.भ.प महादेव महाराज यांनी संस्थेचे कार्य विषद करून कलावंतांच्या मानधनासाठी या प्रमाणपत्राचा खूप मोठा फायदा असल्याचे सांगितले.
    अध्यक्षीय समारोपातून सौ.सरस्वती आडसूळ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त प्रबुद्ध रंगभूमीने केलेला सन्मान हा प्रेरणादायी असून महिलांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावा असे आवाहन केले.

  • या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके व बंडू ताटे यांनी केले तर संत सुफी शमशोद्दीन सय्यद यांनी सर्व भजनी मंडळातील महिलांनी आपले सन्मानपत्र फ्रेम करून दर्शनी भागावर लावावे जेणेकरून राष्ट्रसंत,महापुरुष आणि राष्ट्रमातांची प्रेरणा मिळत जाईल असे सांगून सर्वांचे ह्रदयपूर्वक आभार मानले.
    या महिला सन्मान सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राजेंद्र बारगुले,महेश फाटक,विशाल पवार यांनी परिश्रम घेतले.

  • ह्या कार्यक्रमास पाथर्डी,हावरगाव,करंजकल्ला,
    डिकसळ,दत्त नगर कळंब,बाबा नगर कळंब,एस.टी.कॉलनी डिकसळ,मुंगशी ता.बार्शी,परळी (वै),चोंदे गल्लीतील आदी भजनी मंडळातील ९५ महिला सहभागी झाल्या होत्या.
error: Content is protected !!