August 9, 2025

जागतिक महिला दिन साजरा करताना

  • प्रथम जगातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
    मित्रांना कोणालाही शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे.आजकाल आलेला सुंदर मेसेज फॉरवर्ड करायला एक सेकंद लागत नाही. आला,पहिला, आणी दिला पाठवून. देवाचे तर सुंदर फोटो फॉरवर्ड करून भक्त असल्याचे आपण भाषवितो. त्याचं पूर्ण नाव तरी माहीत असतं का? राष्ट्रीय दिन, वाढ दिवसाचे विविध आलेले सर्व मेसेज उचलने आणि पाठविणे हा मोकार लोकांचा धंदाच झालाय जणू. त्यातून त्यांना देशभक्ती,व्यक्ती प्रेम देव भक्त असल्याचे भाषविले जाते.
    खरंतर कोणताही दिन साजरा करताना आपण आणि आपले योगदान. आपले कार्य.आपला सहभाग.आपला विचार. याचा त्या संबंधित दिवसाचे खरंच मूल्य म्हणून काही संबंध आहे का? हे पाहायला पाहिजे. अगर तसे काहीच नसेल तर आपण जीवन जगत असताना थोडे फार तरी काम करायला पाहिजे. जर काहीच करत नसू तर विनाकारण उठा ठेव का करतोय? एकदा मनाला विचारणे गरजेचे आहे.
    गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक महिला दिन साजरा करताना आनंद वाटायचा. आज मात्र नक्की भीती वाटते. खरंच आपल्या देशामध्ये महिला सुरक्षित आहे का? तिचा रोज सन्मान होतो का? तिला जन्माचा तरी अधिकार मिळतो का? निवास, सुरक्षितता, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, प्रॉपर्टीचा, अधिकार मिळू देतो का? असे अनेक प्रश्न समोर येऊन उभे राहतात. तर दुसऱ्या बाजूला आरक्षणासाठी, न्यायासाठी लढणाऱ्या महिलावर बेच्छूट गोळीबार करतो. लाट्या काठ्या मारतो. देशात धर्मसत्ता आणी राजसत्ता जेव्हा माज करते, तेव्हा पहिल्यांदा बळी हा महिलांचा जातो. जातीच्या, धर्माच्या आड आल्याचे भासऊन महिलेची नग्न धिंड काढली जाते.देशात ठीक ठिकाणी बलात्कार होतात. खून होतात. भर चौकात चाकूचे वार करून ठार मारले जाते. तिला देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश बंदी आणली जाते. मग प्रश्न पडतो देवीच्या मंदिरात उघडे बंब पुरुष कसे चालतात. प्रत्येक ठिकाणी पुरुषाकडून महिलेची विटंबना केली जाते. एक ना अनेक प्रश्न समोर येतात जन्म घेतानीचा प्रश्न.कुमार वयातला प्रश्न. लग्नानंतरचा प्रश्न. विधवा झाल्यानंतरचे प्रश्न परीत्यक्त झाल्यानंतरचे प्रश्न म्हातारपणातले प्रश्न. हे सर्व प्रश्न आम्हाला का सतावत नाही.आपण मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. हे असंच आपल्या देशात घडत असेल तर खरंच शुभेच्छा द्यायची आपली लायकी आहे का? हे तपासने अत्यंत गरजेचे वाटते. असा देश जगामध्ये शोधण्याची आता गरज वाटते आहे.
    कोणता देश असा आहे, की ज्या देशांमध्ये तिच्या जन्माचे स्वागत केले जाते. तिला राहण्याचे, बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, प्रॉपर्टीचे, शिक्षणाचे, समान न्यायाचे, सुरक्षित जगण्याचे,अधिकार पुरुषा इतके नाही तर पुरुषापेक्षा जास्त दिले जातात.आहे का कुठे देश? आहेत का अशी माणसं? ते शोधण्याची अत्यंत गरज आहे. जर जगात कुठेच असा देश नसेल तर मग आपली जबाबदारी आहे, जगात भारत देश तसा निर्माण करावा लागेल. तरच खऱ्या अर्थाने आपण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी लायक असू.
    मित्रांनो विषयाचा समारोप करताना ही सुंदर पवित्र मातृभूमी जिने आपणास दाखविली, तिची अवहेलना,विटंबना थांबली पाहिजे. अहो तिच्यामूळेच तर आपण आज हे विश्व पाहू शकतो. राहू शकतो. जगू शकतो. जर तिने आपनास नाकारले तर ही जन्मभूमी आपल्याला कधीच पाहता येणार नाही. म्हणून देवी इतकं पावित्र्य त्या मातेस मिळायला पाहिजे.म्हणून तर आठ दहा हाताच्या देवी आपण चित्रांमध्ये तरी पाहतो आहोत. अभ्यास करतो.कथांच्या माध्यमातून आपण वाचू शकलो. तशा कर्तत्वान महिला होऊन गेल्यात.हे ही आपण विसरता कामा नये.
    मित्रांनो खरंच ती गुणवान आहे. सृष्टी निर्माता आहे. सुशील आहे. तिला सर्वार्थाने स्वातंत्र्य मिळायलाच पाहिजे. सर्व अधिकार मिळायला पाहिजेत.माणूस म्हणून तिला जगता आलं पाहिजे. हा विचार घेऊन आपल्याला आपला देश सजवायला पाहिजे. नव्या विचाराने, नव्या कार्याने तिला पुरस्कृत करायला पाहिजे. तिला मदत करायला पाहिजे. तिला सांभाळले पाहिजे. तिला सुरक्षितता पुरवल्या पाहिजेत . तिच्या आवडीनिवडीनुसार तिला सर्व कला कौशल्य यामध्ये निपुण करता आले पाहिजे. चला तर असा एक देश निर्माण करू ज्या देशांमध्ये आईचा सन्मान होईल…
  • लेखक — भूमिपुत्र वाघ
error: Content is protected !!