August 9, 2025

मुलांच्या जडणघडणीत आईची भूमिका महत्वाची – डॉ.संजीवनी रमेश जाधवर

  • आढाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधून दि.७ मार्च २०२४ रोजी
    महिला मेळाव्याचे आयोजन शाळा व ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच ज्योतीताई जयचंद वायसे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कळंब येथील प्रसिद्ध डॉ.संजीवनी रमेश जाधवर व सामजिक कार्यकर्त्या नीता संजय देवडा या होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच कालींदा आरकडे तसेच अंगणवाडी सेविका अंजना वायसे, ग्रामपंचायत सदस्या सविता बावणे,आशा कार्यकर्ती सुरेखा सावंत, बचत गटाच्या अध्यक्षा रूपाली हारे,अंगणवाडी कार्यकर्त्या शोभा वायसे,शाळा व्यवस्थापन समिती आढाळा उपाध्यक्षा अर्चना इंगळे,व्यासपीठावरती होत्या यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ.संजीवनी रमेश जाधवर यांनी उपस्थित महिला भगिनी व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
    आपले कुटुंब व आपली मुले यांच्यावर लक्ष देऊन आत्मविश्वासाने आजच्या बदलत्या काळात आपण बदलायला हवं, बदलणार जग समजून घ्यायला हवं ,आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आपण समजून घ्यायला हवीत,तसेच आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक जडणघडणीकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे,हे सांगताना भारतीय महिलांचा इतिहास, सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने या विषयी सुंदर असे मार्गदर्शन केले. तसेच नीता संजय देवडा यांनी आज शिक्षणामुळे अनेक महिला आत्मविश्वासपूर्वक आत्मनिर्भर होऊन उच्च पदावर विराजमान आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपणही सक्षम व्हायला हवे,असे सांगितले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्योती वायसे यांनी भारताला महासत्ता बनवायचे असेल तर महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे हे सांगताना महिलांनी आपल्या मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष द्यावे असे सांगितले. यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा रूपालीताई यांनीही महिलांनी आर्थिक दृष्ट्या साक्षर झालं पाहिजे तसेच बदलत्या भारताचे नेतृत्व त्यांनी केले पाहिजे असे सांगितले.यावेळी गावातील बहुसंख्य महिला तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक महादेव खराटे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकुमार साबळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणप्रेमी नागरिक जयचंद वायसे, सहशिक्षक बलभीम राऊत तसेच उपक्रमशील शिक्षका सुचिता भोसले यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!