August 9, 2025

खोंदला येथे गुणगौरव सोहळा संपन्न

खोंदला – दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.धाबेकर यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निळकंठ (नाना) लांडगे हे उपस्थित होते.
एन एम एम एस परीक्षेमध्ये पात्र झालेल्याऔदुंबर अशोक लांडगे, कृष्णा लक्ष्मण लांडगे,कृष्णा बंडू लांडगे, यश जगन्नाथ मुळीक, साहिल संतोष उबाळे विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला.स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यातील यशस्वी विद्यार्थिनी व स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी तेजस्वीनी विकासलांडगे,आदिती बंडू लांडगे, राजनंदिनी रामहरी नवले, शबनम शकील शेख ,वैष्णवी छत्रगुण गालफाडे ,अंकिता सुरेश मुळीक व पालक यांचा सत्कार करण्यात आला.शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी विद्यार्थी यश धम्मपाल वाघमारे व विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी अथर्व दामाजी लांडगे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
“मी ज्ञानी होणार” स्पर्धेमधील विद्यार्थी इयत्ता आठवी मधून कृष्णा बंडू लांडगे,औदुंबर अशोक लांडगे, आरबाज युसुफ शेख व नववी दहावी मधून आदिती बंडू लांडगे,तेजस्विनी विकास लांडगे, शबनम शकील शेख, फिजा रशीद शेख या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे श्री निळकंठ नाना लांडगे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल अशा प्रकारचे मार्गदर्शन केले .शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक लक्ष्मण लांडगे, छत्रगुण गालफाडे, बंडू लांडगे, अशोक लांडगे,जगन्नाथ मुळीक,श्रीनिवास लांडगे,प्रमुख पाहुणे निळकंठ (नाना) लांडगे मुख्याध्यापिका श्रीमती धाबेकर एस. जे, सहशिक्षक भोंडवे एम.डी,राऊत डी.ए. व चव्हाण जी. व्ही .हे उपस्थित होते.

error: Content is protected !!