August 9, 2025

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज सादर करावेत – सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

  • धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना व व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता या विविध योजनांचा लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो.
  • शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 11 ऑक्टोबर, 2023 पासून सुरू झाली आहे. तथापि, विद्यार्थी अर्ज नोंदणी प्रमाण खूप कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता महाडीबीटी प्रणालीवर एकूण 7 हजार 575 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु अद्यापपर्यंत फक्त 4 हजार 419 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 701 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी कार्यालयामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे, दुरध्वनीद्वारे संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. परंतु अद्यापही महाविद्यालयांनी अर्ज मंजूरीकरिता जिल्हा कार्यालयाकडे सादर केले नाही. ही बाब गंभीर असून एखादा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले पात्र अर्ज तात्काळ या कार्यालयाकडे पाठवावेत. तसेच शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीचे प्रमाण वाढविण्याकरिता प्राचार्यांनी आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांना सूचित करावे व एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
error: Content is protected !!