कळंब (महेश फाटक ) – केज कळंब मार्गावरील मांजरा नदीवर मराठा बांधवांनी दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले. यांना पाठिंबा देण्यासाठी येथील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले आहे.कळंब हून येरमाळा,ढोकी कडे जाणाऱ्या शहरातील सर्व मार्गावर नाकाबंदी करत तब्बल २ तास आंदोलन करन्यात आले. मनोज जरंगे यांची प्रकृती खालावली आहे.असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कळंब येथील सकल मराठा समाजाने बीड धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. मांजरा नदिच्या पुलावरील रास्ता रोकोमूळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे उपोषणाचा पाचवा दिवस आहे,अन्नपाणी त्याग केलेल्या जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच सोमवारी कळंब येथे आठवडी बाजाराचा दिवस असतानाही बंद पाळण्यात आला होता. आता सरकारने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी कळंब येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे हे आंदोलन दोन तास चालले. यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे आंदोलक उपस्थित आहेत. सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मंडळ अधिकारी टी.डी.मटके यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी तैनात होता.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन