उस्मानाबाद – जनता सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल सदासुख मोदाणी (वय 80) यांचे दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी वार बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान वार्धक्यामुळे निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. येथील सह्याद्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात तीस शाखांच्या माध्यमातून मोठा विस्तार असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. जनता बँकेत पूर्वी सरव्यवस्थापक राहिलेले मोदाणी यांनी मागील दहा वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिला. तोट्यात असलेल्या बँकेला उर्जितावस्था देऊन बँकेला नफ्यात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता धाराशिव शहरातील बार्शी रोडवरील हातालादेवी परिसरात त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनता बँकेचे संचालक आशिष मोदाणी, उद्योजक अमित मोदाणी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी