August 9, 2025

कळंबचा रणवीर पवार राज्यात दुसरा

  • कळंब (जयणारायन दरक) – महाराष्ट्र राज्य यूसीमास अबॅकस तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत इयत्ता चौथी वर्गात शिकणाऱ्या कळंबच्या रणवीर राजेंद्र पवार याने राज्यात दूसरा क्रमांक मिळविला.
    महाराष्ट्र यूसीमास तर्फे घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभात त्याला पालकांसह यूसीमास इंडियाचे प्रमुख स्नेहल कार्या यांच्या हस्ते ट्राॅफी देऊन सन्मानित करण्यात आले.
    यावेळी महाराष्ट्र यूसीमासचे प्रमुख नितीन बेंद्रे,रश्मी इंदोलकर हे उपस्थित होते.
    यशस्वी विद्यार्थ्यास अथर्व अबॅकसच्या संचालिका राजेश्री देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!