August 9, 2025

मुखीम सिद्दिकी यांचा वाढदिवसा साजरा

  • कळंब – तुळजाई प्रतिष्ठान संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधिर विद्यालय कळंब जि.धाराशिव येथे मुखीम सिद्दिकी सर (मुख्य कार्यकारी अधिकारी ) पवनराजे लोकसमृध्दी मल्टीस्टेट धाराशिव यांचा वाढदिवस साजरा मोठ्या उत्साहात करण्यात आला.यावेळी मुकबधीर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
    पवनराजे लोकसमृध्दी मल्टीस्टेट शाखा कळंब चे शाखा व्यवस्थापक लहु व्हंडे यांनी कार्यक्रमाचे प्रताविक केले व मुखीम सिध्दीकी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
    तसेच असिस्टंट मॅनेजर सुदर्शन शेंडगे,श्रीमंत माळी,मनोहर शिंदे,अमर यादव,यश बिडवे , राजेंद्र लांडगे,पत्रकार राजे सावंत, माऊली सगर व शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर यांच्या हस्ते मूकबधिर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रुबा कोठावळे यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!