August 9, 2025

ह.भ.प.सुरेश महाराज बोराडे यांना साधूबुवा देवस्थानच्या वतीने श्रद्धांजली

  • कळंब – वारकरी संप्रदायातील ह.भ.प.सुरेश महाराज बोराडे ( ७८ ) यांचे तेरणा चारिटेबल ट्रस्ट रुग्णालय नेरूळ मुंबई येथील रुग्णालयात उपचार दरम्यान दिनांक ९ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी ११ .०० वाजता दुःखद निधन झाले.
    ह.भ.प.सुरेश ज्ञानोबा बोराडे महाराज कळंब पंचक्रोशीत प्रवचन,कीर्तनकार म्हणून परिचित होते.संत ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरी यांचे ते भक्त होते संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दर्शनासाठी सवडी प्रमाणे भक्त जात असतात. या सदभक्तांना एकत्रित दर्शनासाठी जाता यावे यासाठी गेली २८ वर्ष प्रत्येक वर्षी श्री संत साधू बुवा पालखी सोहळा पिंपळगाव (डोळा) व पायी दिंडी सोहळा विठ्ठल मंदिर पुनर्वसन सावरगाव कळंब ते उत्तरेश्वर पिंपरी आयोजन करीत असत.या दिंडीत पिंपळगाव (डोळा) डिकसळ, खडकी,कळंब येथील साधू बुवा व माऊलीचे भक्त सहभागी होतात बोराडे महाराजांनी पुनर्वसन सावरगांव कळंब येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे निर्माण कार्य केले आहे.साधू बुवा देवस्थानच्या विकासासाठी त्यांचा पुढाकार असे ते प्रतिवर्षी कीर्तन सेवा करत असत त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली. ह.भ.प सुरेश बोराडे महाराज यांना साधूबुवा देवस्थान समिती व भक्त यांच्या वतीने ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ,सुखदेव नाना टेकाळे, सुभाष घोडके, नारायण दशवंत, सुरेश टेकाळे ,माधवसिंग राजपूत, अंगद टेकाळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
error: Content is protected !!