August 9, 2025

गुणवंत विद्यार्थ्यांचा अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या हस्ते सत्कार संपन्न

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्य
    वृत्ती परीक्षेत पात्र यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठवाड्यातील प्रसिद्ध शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके संस्थेचे संचालक तात्यासाहेब पाटील ,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर
    यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
    या परीक्षेमध्ये शाळेतील सात विद्यार्थी पात्र झाले. यामध्ये श्रावणी वीर, युवराज थोरबोले,आयुष भाकरे, सुहानी सावंत, प्रांजली कसबे, रोहन सातपुते, प्रतीक्षा सातपुते या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
    या विद्यार्थ्यांना सतीश मडके, धनंजय मडके, शैलेश गुरव, राजाभाऊ चिलवंत यांनी मार्गदर्शन केले.
    या विद्यार्थ्यांचे मोहेकर ऍग्रो चे चेअरमन हनुमंत मडके, , मुख्याध्यापक संजय जगताप, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी गावातील नागरिक,सर्व शिक्षक शिक्षका व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!