कन्हेरवाडी – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील विद्या विकास हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती पाटील एस.डी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील ८ वीच्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १५ पैकी ०९ विद्यार्थी उत्तीर्ण होवून घवघवीत यश संपादन केले आहे. या हायस्कूल मधील कु.गौरव लक्ष्मण शिंदे -११४,कु.धवलसिंह श्रीकांत पिंगळे -१०१,कु.राज गोरख साळुंके -८८,सुहानी शेषेराव मिटकरी -८२, समृद्धी बाबासाहेब मिटकरी-७८,रोहन गोविंद मिटकरी-७२, सुहाना दशरथ सुरवसे-६९,यश संतोष खंडागळे-६१,महेश्वरी शाहू शिनगारे-५८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,मुख्याध्यापक श्रीमती पाटील एस.डी,माळी एस.एल,कुमरे एम.बी,मोरे एस.आर,देशमुख ए.बी, पांचाळ एस.व्ही,जेवे डी.एस आदींनी स्वागत केले आहे. या यशामुळे विद्याविकास हायस्कुलचे गावातील नागरिकांनी स्वागत अभिनंदन केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले