कळंब – धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहिते यांचा सत्कार भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष संजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध खेळांच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन शेकडो विद्यार्थी घडविलेल्या तसेच राज्य व देश पातळीवरील कबड्डी स्पर्धेचे पंच म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडलेल्या लक्ष्मण (तात्या) मोहिते यांची धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वी निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल कळंब येथे त्यांचा सत्कार भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष संजय घोगरे यांनी केला यावेळी कळंब तालुका पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे, जनजागृती विद्यालयाचे बोकेफोडे, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते. मोहिते यांच्या निवडी बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले