August 9, 2025

दुध उत्पादकांना पाच रुपये अनुदान मिळाल्याने दुधगावकरांचा सत्कार

  • धाराशिव –
    एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून तुगाव (ता. धाराशिव) येथे शनिवारी (दि.३) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये तुगाव गावातील शेतकरी शेतमजूर व दूध उत्पादकाच्या वतीने दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, यासाठी आंदोलन केल्याबद्दल संजय पाटील दुधगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
    जिल्ह्यातील सर्व खाजगी संस्थांना व त्यांच्या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे शासनाने मान्य केले. याबद्दल दूध उत्पादक आणि दुधगावकरांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी संवाद साधताना दुधगावकर यांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी शेतमजूर दिन दलित उपेक्षित आदिवासी कर्मचारी या सर्वांच्या कामासाठी सदैव उपलब्ध व मदतीसाठी तयार राहील, या पुढच्या काळामधील दुष्काळाच्या परिस्थितीत आपण सगळ्यांनी धैर्याने तोंड देऊ शेतकऱ्यांनी कुठल्याही अडचणी आल्या तरी आत्महत्या करण्यासारखं टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन केले. याप्रसंगी सरपंच किशोर शेंडगे, गणेश गडकर, मोहन लोमटे, सुशील गडकर यांनी दुधगावकरांचे स्वागत केले. याप्रसंगी गावातील डीपीची संख्या कमी असल्यामुळे लाईट मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निकाल लागूनही धरणातील वाढीव भूसंपादन मावेजा अद्यात मिळाला नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली. याप्रसंगी सरपंच किशोर शेंडगे, बाबुराव गडकर, गणेश गडकर, मोहन लोमटे, नेताजी गडकर, अण्णा शेंडगे, शहाजीराव शेंडगे, महादेव गडकर, चंद्रपूर शेंडगे, मिटू हाजगुडे, शिवाजी हाजगुडे, गुणवंत गडकर, धर्मातात्या लोमटे, संभाजी लोमटे, बापू गडकर, माणिक भुतेकर, शिवाजी भुतेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!