August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 116 कारवाया करुन 80,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • वाशी पोठाच्या पथकास आरोपी नामे-1) सिताबाई भगवत शिंदे, वय 45 वर्षे, रा. रामकुंड ता. भुम जि. धाराशिव या दि.02.02.2024 रोजी 09.30 वा. सु. आपल्या राहात्या घराचे बाजूला पत्राचे शेडचे बाजूस अंदाजे 2,850 ₹ किंमतीची 35 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे-1) पंडीत धोंडीबा कांबळे, वय 62 वर्षे, रा. पाडोळी आ. ता. जि. धाराशिव हे दि.02.02.2024 रोजी 12.00 वा. सु. राम झेंडे यांचे घराचे उत्तर बाजूस मोकळ्या जागेत बौध्द नगर धाराशिव अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- 2)अंजना चंदर पवार, वय 55 वर्षे, रा. जुना बस डेपो, पारधी पिढी, धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.02.02.2024 रोजी 18.35 वा. सु. आपल्या राहात्या घराचे समोर अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- 3)निलावती सुरेश काळे, रा. बोंबले हनुमान मंदीर परिसर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.02.02.2024 रोजी 17.00 वा. सु. आपल्या राहात्या घराचे पत्राचे शेडचे समोर बोंबले हनुमान मंदीर परिसर धाराशिव येथे अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.02.02.2024 रोजी 17.30 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत कसगी येथील बसवेश्वर चौकातुन गावात येताना मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रणधीर राजेंद्र आलगुडे, वय 32 रा. हनुमान नगर कसगी, ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. कसगी येथील बसवेश्वर चौकातुन गावात येताना मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 10,270 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.02.02.2024 रोजी 18.20 वा. सु. वाशी पो. ठा. हद्दीत पारगाव बसस्थानक समोरील परिसरात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रामहारी पंडीत आखाडे, वय 29 रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव हे 18.20 वा. सु. पारगाव बसस्थानक समोरील परिसरात कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 540 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.02.02.2024 रोजी 18.30 वा. सु. कळंब पो. ठा. हद्दीत विजय बेकरीच्या समोर चहाच्या टपरीवर रिकामे जागेत कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)पाशा दगडु शेख, वय 25 रा. चोंद गल्ली ता. कळंब जि. धाराशिव,2) दत्तात्रय रामदास गायकवाड, वय 23 रा. कळंब जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. विजय बेकरीच्या समोर चहाच्या टपरीवर रिकामे जागेत कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “अपत्य जन्माची लपवणूक करुन विल्हेवाट लावणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • बेंबळी पोलीस ठाणे : अपत्य जन्माची लपवणूक व्हावी व अर्भकाचा परित्याग करण्याचे उद्देशाने व मृत्यु व्हावा या अवैध उद्देशाने एक स्त्री जातीचे अर्भक जिल्हा परिषद शाळेच्या पडीक असलेल्या इमारतीमध्ये आतील बाजूला व्हरांड्यात बेंबळी येथे दि.02.02.2023 रोजी 08.40 वा. सु. अज्ञात व्यक्तीने आणुन टाकले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रविकांत मधुकर जगताप, वय 36, पोलीस नाईक/ 1219 नेमणुक- पोलीस स्टेशन बेंबळी यांनी दि. 02.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं. वि. सं. कलम- 317 अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अर्जुन अण्णाराव देवकर, वय 45 वर्षे, रा. वाणेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.02.2024 रोजी 22.00 ते दि. 02.02.2024 रोजी 06.00 वा. सु तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 1,40,000 असा एकुण 4,30,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अर्जुन देवकर यांनी दि.02.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रकाश मनोहर धस, वय 54 वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी रा. पुर्नवसन सावरगाव कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 29.01.2024 रोजी 15.00 वा. सु. आठवाडी बाजार येथील बाबाघाट पतसंस्था कळंब येथे बाजार करण्यासाठी आले असता भाजीपाला घेत असताना त्यांचा विवो कंपीनचा मोबाईल फोन अंदाजे 26,999 ₹ किंमतीचा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रकाश धस यांनी दि.02.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-संतोष आसाराम राठोड, रा. गुनशी तांडा ता.घनसांगवी, जि. जालना यांनी दि. 06.06.2023 रोजी 10.00 ते दि.22.08.2024 रोजी 11.00 पावेतो फिर्यादी नामे-पांडुरंग मोहन चव्हाण, वय 35 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांचे कडून नमुद आरोपींनी उसतोड कामगार पुरवितो म्हणून एकुण 8,75,000 ₹ फोन पे वर घेवून दि. 01.11.2023 मधील गळीत हंगाम, उसतोड कामगार(कोयते मुकादम) यांचे मार्फतीने भैरवनाथ शुगर कारखाना वाशी येथे लेबर पुरवितो असे फिर्यादीस विश्वासात घेवून आरोपीने उसतोड कामगार पुरवितो असे सांगून उसतोड कामगार पुरविले नाही. तसेच फिर्यादीची व भैरवनाथ शुगर कारखाण्याची विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पांडुरंग चव्हाण यांनी दि.02.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 406, 420 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-हिराबाई भुजंग येडे, वय 74 वर्षे, रा. महालदारपुरी, ता वाशी जि. धाराशिव, 2) सचिन भिमराव कवडे, वय 39 रा. वाशी, 3)कामधेनु मधुकर ढेंगळे, वय 60 वर्षे, रा. पारा, ता. वाशी जि. धाराशिव ह.मु. शिवाजीनगर कळंब ता. कळंब जि धाराशिव, 4)लक्ष्मण कल्याण कवडे, वय 53 वर्षे, रा.वाशी, 5) राम गोविंद दळवे, रा. पारा ता. वाशी, 6) उमेश भुजंगराव येडे, वय 45 वर्षे, रा. महाददारपुरी, ता. वाशी, 7) पांडुरंग रामराव कवडे, वय 50 वर्षे, रा. वाशी, 8) मधुकर बाबुराव ढेंगळे, वय 65 रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव ह.मु. शिवाजीनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव, 9) दुय्यम निबंधक वाशी श्री पाटील, 10) अशोक विनायक चेडे, बॉड रायटर दुय्यम निबंधक कार्यालय वाशी यांनी दि. 30.01.2023 रोजी 10.00 वा. सु. दुय्यम निबंधक कार्यालय वाशी येथे फिर्यादी नामे- अंगद शंकरराव चेडे, वय 56 वर्षे, रा. वाशी जि. धाराशिव यांचा मयत भाउ बळीराम शंकर चेडे यांचे नावावरील मौजे वाशी, ता. वाशी जि. धाराशिव येथील भु क्र. 486/अ मधील जमीन हडप करण्याचे हेतुने गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून नमुद आरोपीतांनी मयत बळीराम शंकर चेडे यांचे आर्थिक नुकसान व्हावे व नमुद आरोपींचा आर्थिक फायदा होण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करुन विश्वासघात करुन फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अंगद चेडे यांनी दि.02.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 120 ब, 420, 465, 467, 471, 143, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- धोंडीराम शामराव मदने,रा. दस्तापुर तांडा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 02.02.2024 रोजी 11.30 वा. सु. बलभीम चव्हाण यांचे घरासमोर फिर्यादी नामे- लक्ष्मण आनंदा मदने, वय 35 वर्षे, रा. दस्तापुर तांडा ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींतांच्या शेतात जळालेली अवस्थेत मिळाली होती. ती मोटरसायकल दुसरीकडे ठेवली असता फिर्यादीने ती मोटरसायकल कोठे ठेवली हे विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लक्ष्मण मदने यांनी दि.02.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) गफुर मेहताब शेख, 2) लायक गफुर शेख, 3) करीम गफुर शेख, 4) सोहेल करीम शेख, 5) शबाना लायक शेख, 6) जहीराबी करीम शेख रा. कोराळ ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.02.2024 रोजी 13.30 वा. सु. कोराळ शिवारात गोविंद कोळी यांचे शेताजवळ फिर्यादी नामे-मुन्वर पाशा गुंडू मसुद, वय 38 वर्षे, रा. कोराळ ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नीस नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मुन्वर पाशा मसुद यांनी दि.02.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 143, 147, 149, 323, 504,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) अशोक नारायण शिवलकर,2) अभिजीत अशोक शिवलकर, दोघे रा. महादेववाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.02.02.2024 रोजी 11.30 वा. सु. महादेववाडी ता. जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे- जयश्री अरुण शिवलकर, वय 54 वर्षे, रा. महादेववाडी, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने त्यांचे घरासमोरीली अंगणात बांधकामाची डस्ट, खडी व सिमेंट का टाकले या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप व विळ्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जयश्री शिवलकर यांनी दि.02.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!