August 9, 2025

महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

  • कळंब – कळंब येथील संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे आझादहिंद सेनेचे प्रमुख भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महान क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२७ वी जयंती कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशनचे प्रदेश सचिव सुफी समशुद्दीन सय्यद यांनी पाहुण्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला. या कार्यक्रमात प्रा.अरविंद खांडके,सुफी शमशुद्दीन सय्यद, माधवसिंग राजपूत,सचिन डोरले,एकनाथ जाहीर, शंकर बोराडे ,सचिन क्षीरसागर व कार्यक्रमाचे अध्यक्ष ह .भ. प .महादेव महाराज अडसूळ यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारक कार्याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अमर तापडिया,जयहिंद सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किशोर शेंडगे, यशवंत हौसलमल ,पोपट साळवे ,जितेन कसबे, बार्शी येथील ह.भ.प.परशुराम डोंबे महाराज, उद्योगपती बाळासाहेब गाताडे, सोमनाथ राऊत, योगेश गाताडे ,यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!