August 9, 2025

सुरेश दाजी प्रीमियर लीग चे उद्घाटन

  • कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कळंब येथे सुरू करण्यात आलेल्या सुरेश दाजी बिराजदार प्रीमियर लीग च्या पर्व १ चे उदघाटन समारंभ दि.२४ जाने २०२४ रोजी कळंब येथे संपन्न झाला.
    आजच्या संगणक युगात मैदानी खेळ दुर्मीळ होत चालले असताना तरुणाई मध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी व मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, जेष्ठ नेते भास्कर खोसे, ऍड प्रवीण यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंतनु खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता तनपुरे, तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले, तालुका उपाध्यक्ष अगतराव कापसे, युवक तालुकाध्यक्ष अमर मडके, उपाध्यक्ष करीम पठाण,युवक शहराध्यक्ष विक्रम चोंदे, उपाध्यक्ष अभिजित हौसनमल,सचिव नितीन ठाणबीर, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड, सोशिअल मीडिया अध्यक्ष उदय खंडागळे, विद्यार्थी शहराध्यक्ष रणजित भोसले व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
    या होणाऱ्या स्पर्धेसाठी तब्बल १६ संघांनी उपस्थिती नोंदवली आहे.तर प्रथम बक्षीस १ लाख रुपये,द्वितीय बक्षीस ५०००० रुपये, तृतीय बक्षीस २०००० आणि चतुर्थ बक्षीस २०००० रुपये असे आयोजकांनी स्वरूप ठेवले आहे.
    विकास हौसलमल,अक्षय हौसळमल,संग्राम मोहिते,वैभव गायकवाड, सोनू घुले, इंद्रजीत कोकाटे, अज्जू खान, अमोल लोकरे, शक्ती गायकवाड, सागर पटेकर, सनी कांबळे,सिकंदर वैरागे, युवराज पंडित, अविनाश वैरागे, बाबा जाधव आदी आयोजकांनी या स्पर्धेचे उत्तम असे आयोजन केले आहे.
    २८ जानेवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
error: Content is protected !!