कळंब – तालुक्यातील खोंदला येथील अंगणवाडी सेविका रत्नमाला निवृत्ती पवार (६५) यांचे दि.१७ जानेवारी २०२४ बुधवार रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर खोंदला येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.माजी सरपंच निवृत्ती विठ्ठल पवार यांच्या त्या पत्नी होत्या तसेच त्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या.त्यांच्या सेवेमधून गावातील अनेक विद्यार्थी मंडळी ही मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे सर्व गावात हळहळ व्यक्त होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले