कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुपकर जे.डी यांचा सेवापुर्ती कार्यक्रम विद्यालयात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणसम्राट क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मनोरामाताई शेळके ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, संस्थेचे सचिव ॲड. छत्रभुज भवर, कार्याध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, प्रा. बाळकृष्ण भवर ,भागवत सुरवसे, डी.के .कुलकर्णी,सुरेश टेकाळे, अंकुश नाडे,बालाजी तांबे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे- भवर यांनी केले. प्रस्ताविकेमध्ये कुपकर यांच्या विषयी माहिती सांगण्यात आली. मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी कुपकर सरांच्या कामाचे कौतुक केले. संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेच्या वतीने कुपकर सर यांचा संपत्नीक भर पेरावा आहेर सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर गोंदकर यांनी केले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात