करंजकल्ला – दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजकल्ला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणुन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई परमेश्वर टोणगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सर्वांनी विनम्र अभिवादन केले.उपस्थित सर्व महिलांचे शाळेच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल भाषणातून आपले विचार व्यक्त केले.तर काही मुलींनी सावित्रीच्या ओव्या गात कार्यक्रमात उत्साह वाढविला.शाळेतील शिक्षिका श्रीम.स्मिता कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारीत प्रेरणादायी कविता सादर केली.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी यांच्यासाठी काढलेल्या पत्राचे वाचन करून सर्व विद्यार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज दिवाणे,सहशिक्षक बाबु बोंदरे, बापु भंडारे, उत्तम ढेपे, अखिल कुलकर्णी,अनंत डोंगरे तर शाळेतील शिक्षिका श्रीम.अनिता रानभरे,श्रीम,स्मिता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम ढेपे यांनी तर आभारप्रदर्शन भंडारे बी.एन.यांनी केले.या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी व बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन