August 9, 2025

विद्यापीठ उपपरिसरात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

  • धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात दि.३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायक व मार्गदर्शक आहे. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले. यावेळी कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, योगेश घाडगे, वरिष्ठ सहाय्यक विश्वास कांबळे, संजय जाधव, श्रीकांत सोवितकर, अशोक लोंढे, विठ्ठल कसबे, तुकाराम हराळकर, इंद्रजीत भालेकर तसेच सर्व विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
error: Content is protected !!