मुंबई (तात्यासाहेब सोनवणे) – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथील भीमा नदीच्या किनाऱ्यावर तत्कालीन इंग्रज प्रशासनाने शौर्याचे प्रतिक म्हणून जो विजयस्तंभ उभारला आहे; त्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातून विविध राज्यातून १ जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी येत
असतात. सदर विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या सोयी सुविधा पुणे जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग देत असतात. याही वर्षी सालाबादाप्रमाणे सदर आंबेडकरी अनुयायांची सोयी सुविधा करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व बार्टीचे प्रशासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांसाठी राखीव असलेल्या निधीतून भोजनासाठी ६० लाख रूपये खर्च करणार असल्याचे समजते. या खर्चास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजाराम खरात,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव साबळे यांनी पूर्ण विरोध दर्शविला असून या संदर्भात त्यांनी परिपत्रक जारी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनेसाठी राखीव असलेल्या निधीतून इतरत्र खर्च करण्याचे अधिकार बार्टीला कोणी दिले? १ जानेवारीचा भिमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदनेचा कार्यक्रम राज्य शासनाने आपल्या विशेष निधीतून करावा अशी मागणी राजाराम खरात व नामदेव साबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती