खोंदला (परमेश्वर खडबडे) – दि.22 डिसेंबर 2023 रोजी श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय, खोंदला येथे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 136 व्या जयंतीच्या निमित्ताने गणित दिन साजरा करण्यात आला. गणित दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये गणितोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गणितोत्सवाच्या निमित्ताने परिपाठामध्ये गणित विषयक कोडी गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी याविषयी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. धाबेकर यांच्या हस्ते गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणित उत्सवाच्या निमित्ताने शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व गणित विषय पोस्टर प्रेझेंन्टेशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. गणित विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन गट तयार करण्यात येऊन या दोन गटांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. धाबेकर,शिक्षक भोंडवे एम.डी., राऊत डी.ए.व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले