कळंब (महेश फाटक यांजकडून ) – औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे दिनांक १९ रोजी तंत्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. या तंत्र प्रदर्शनामध्ये ०९ व्यवसायातील प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेऊन २९ प्रोजेक्ट या ठिकाणी सादर केले होते. या तंत्र प्रदर्शनाची उद्घाटन ॲप टेक कॉम्प्युटरचे संचालक प्रा.संजय घुले हे होते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य के.जे पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून जी.बी.करडे श्रीराम स्टील वर्क तथाआय एम सी सदस्य व श्रीकांत खारके समर्थ इंडस्ट्रीज हे उपस्थित होते. प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व तसेच त्यांच्यातील संशोधक वृत्ती जागृत व्हावी आणि त्यांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या रोजगारांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून या तंत्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या तंत्रप्रदर्शन मध्ये सादर केलेले एकूण २९ प्रोजेक्ट पैकी तालुकास्तरीय ०३ प्रोजेक्टची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम ड्रेस मेकिंग व्यवसायातील वेगवेगळ्या कपड्याच्या कलाकृती, द्वितीय यांत्रिक मोटार गाडी व्यवसायाचे व्हेईकल पंचर रिडूसर, तृतीय वीजतंत्री व्यवसायाचा ट्रेन अक्सिदेंट दिटेक्टर यांची निवड करण्यात आली. सदर तंत्रप्रदर्शन दुपारी बारा ते पाच या दरम्यान सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले होते. भैरवनाथ प्रायव्हेट आयटीआय कळंबचे कर्मचारीवर्ग आणि प्रशिक्षणार्थी यांनी तंत्रप्रदर्षण पाहण्यासाठी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील गट निदेशक शामकांत डोंगे, मुख्यलिपिक रविचंद्र जगदाळे, भांडारपाल बाजीराव राऊत, शिल्पनिदेशक शरद बेलेकर, शिल्पनिदेशक एम. बी. जाधव, शिल्पनिदेशक अंकुश माळकर, शिल्पनिदेशका आर के फुलारी, शिल्पनिदेशका कल्पना जाधवर, शिल्पनिदेशक अतुल वाघमारे, कनिष्ठ लिपिक व्ही.एम.सुरवसे, शिल्पनिदेशक कल्लेश भोसले, शिल्पनिदेशक बालाजी पांचाळ, शिल्पनिदेशक धैर्यशील मडके, शिल्पनिदेशक अक्षय सुतार, शिल्पनिदेशक कूटवाड, शिल्पनिदेशक नदीम शेख, शिल्पनिदेशक वसंत टोपे, लिपिक सुलाखे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पप्पू मडके, रवींद्र जेठीथोर, फर्जाना शेख, बिभीषण यादव यांनी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात