कळंब (जयनारायण दरक) – वाळू वाहतूक करू देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना कळंब येथील तहसीलदार यांच्या ड्राइव्हरला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळु वाहतुक करण्याचा व्यवसाय करतात त्यांना वाळु वाहतुक करुन देण्यासाठी व वाळुचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी यातील आरोपी तहसीलदार यांच्या गाडीवरील चालक अनिल सुरवसे यांनी 19 डिसेंबर रोजी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणुन 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती आठ हजार रुपये घेण्याचे ठरले. सदरील रक्कम तक्रारदार यांचेकडुन आज दिनांक 20 डिसेंबर रोजी पंचांसमक्ष स्विकारल्याने चालक अनिल सुरवसे यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय कर यांचा समावेश होता.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात