धाराशिव (जिमाका) – राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाची बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण तपासणीची वेळ सकाळी 8.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत अशी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दि.11 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाविद्यालय परिषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील बाह्यरुग्ण (ओपीडी) तपासणी विभागाची वेळ सकाळी 8.30 वाजेपासून दुपारी 12.00 वाजे ऐवजी दुपारी 1.00 वाजेपर्यत करण्यात आली आहे. दि.14 डिसेंबर 2023 पासून बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण तपासणी वेळ सकाळी 8.30 वाजूपासून दुपारी 1.00 वाजेपर्यत सुरु असेल.यावेळेत बाह्य रुग्ण विभागात पूर्णवेळ डॉक्टर उपस्थित राहतील.याची सर्व रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी नोंद घ्यावी.असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकत्सिक डॉ.तानाजी लाकाळ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात