August 9, 2025

वेद संकुलातील तीन मॉडेल जिल्हास्तरीय तंत्रज्ञान प्रदर्शनात

  • कळंब – शहरातील संभाजीनगर मधील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी तयार केलेले तीन मॉडेलची दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी धाराशिव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात निवड करण्यात आली.
    महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय औद्योगिक संस्थेत होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी वेद शैक्षणिक संकुलाच्या वर्कशॉपमध्ये तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
    यामध्ये संस्थेतील एकूण २२ प्रशिक्षणार्थींनी वेगवेगळे मॉडेल सादर केले होते.
    यांमधून पवन ऊर्जा प्रकल्प,हॉस्टेल वायरिंग, इन्व्हर्टरचे मॉडेल यांची निवड करून जिल्हास्तरावर पाठविण्यात आले.
    यावेळी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,निदेशक विनोद जाधव,निदेशक सागर पालके,निदेशिका कोमल मगर,लिपिक आदित्य गायकवाड, विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!