कळंब – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अनंतराव घोगरे यांची धाराशिव जिल्हा काँग्रेस (आय ) पक्षाचे चिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे.त्यांना या नियुक्तीचे पत्र धाराशिव येथे झालेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,उपाध्यक्ष प्रशांत पाटील ,जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने,महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप भालेराव ,महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अभिजीत चव्हाण,अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आयुब पठाण ,जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अभिजीत गुजर,जिल्हा काँग्रेस क्रीडा अध्यक्ष अशोक बनसोडे , धाराशिव तालुकाध्यक्ष रोहित पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या नियुक्ती पत्रात पक्षाकडून जिम्मेदारी देत असताना पक्ष वाढीसाठी व संघटना बांधणीसाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे विचार ग्रामीण भाग तसेच कार्यकर्त्यापर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल अनंतराव घोगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात