धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.16 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 134 कारवाया करुन 1,02,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
मुरुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अनुसया विजयकुमार पाटील, वय 40 वर्षे, रा. केसरजवळगा, ता. उमरगा जि. धाराशिव यांचे मुलीचे लग्न असल्याने त्या व त्यांचे नातेवाईक लग्नासाठी बाहेरगाव गेल्या असता त्यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 15.12.2023 रोजी 08.00 ते 17.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील रोख रक्कम 1,16,284₹, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण 1,78,584₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनुसया पाटील यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सुवर्णा विष्णु देशमाने, वय 44वर्षे, रा. जागजी ह.मु. साईनाथ कॉलनी खुनेगाव गावदेवी मंदीर भिवंडी ता. जि. ठाणे या दि. 16.12.2023 रोजी 05.30 वा. सु. धाराशिव बसस्थानक येथे त्यांचे जवळील पर्स खाली ठेवून कंट्रोल रुम येथे जागजी येथे जाणारी बसची विचारपूस करत होत्या. दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांचे पर्स मधील सोन्याचे 15 ग्रॅम वजनाचे गंठन, अंगठी, फुले, झुमके, व चांदीची चईन, चांदीचा करंडा व रोख रक्कम असा एकुण 1,69,530₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुवर्णा देशमाने यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मेघश्याम मोहन तारी, वय 43 वर्षे, रा. बांधा ता. सावंतवाडी जि. सिंधदुर्ग यांची अंदाजे 65,000₹ किंमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय. 8217 जिचा चेसी नं –MBLHAW122NHHB 8227, इंजिन नं-HA11EDNHM43773 ही दि. 29.11.2023 रोजी रात्री 21.30 ते दि. 30.11.2023 रोजी 11.45 वा. सु. फिर्यादी मेघश्याम तारी यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मेघश्याम तारी यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- रोहीदास संजय चव्हाण, वय 35 वर्षे, रा. दुर्गातांडा ता.कंधार जि. नांदेड यांची अंदाजे 5,00,000₹ किंमतीची ट्रक क्र एडी.2291 टाटा एल पी टी कंपनीचा ही बीगाडल्याने. दि. 12.11.2023 रोजी 23.30 ते दि. 13.11.2023 रोजी 03.00 वा. सु. मंगरुळ घाटात रोडवर उभी केलेली असताना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहीदास चव्हाण यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)मनोज मल्लीनाथ घोडके,रा. अणदुर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.16.12.2023 रोजी 10.30 वा. सु. घोडके वस्ती अणदुर येथे फिर्यादी नामे-रेवती तुळशीदास घोडके, वय 20 वर्षे, रा. घोडके वस्ती अणदुर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांना नमुद आरोपीने घरात घुसून तु मला का बोलत नाही तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाइपने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच अॅसिड सारखा पदार्थ फिर्यादीचे हातावर टाकुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रेवती घोडके यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 326(अ), 324, 323, 452, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)नवनाथ बाबा खाडे,रा. सोनारी, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 16.12.2023 रोजी 12.00 वा. सु. सोनारी येथे गणपती मंदीरासमोर फिर्यादी नामे- बाबा रामभाउ खाडे, वय 70 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने तु चिम्याला घराबाहेर जाईला का सागिंतले या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बाबा खाडे यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 13 छापे.”
मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.16.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 13 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 5,000 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 285 लि. गावठी दारु, 29 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 2,86,160 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 13 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) धाराशिव शहर पोठाच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-संजय राजेंद्र काळे, रा. जुना बस डेपो धाराशिव ता.जि.धाराशिव हे 08.20 वा. सु. आपल्या राहात्या घराचे समोर अंदाजे 1,10,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे 2,200 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 40 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- लक्ष्मण राजाराम निचळे, रा. इंगळे गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 08.30 वा. सु. इंगळे गल्ली धाराशिव येथे अंदाजे 5,600 किंमतीचे गावठी दारु 70 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- सुनिता संजय पवार, वय 45 वर्षे, रा. जुना बस डेपो पारधी पिढी धाराशिव ता. जि धाराशिव या 08.55 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 53,100 ₹ किंमतीचे 1,000लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जिजाबाई काऱ्या काळे, वय 50 वर्षे, रा. जुना बस डेपो पारधी पिढी धाराशिव ता. जि धाराशिव, या 09.05 वा. सु. तुळजापूर नाका, पारधी पिढी येथे अंदाजे 63,400 ₹ किंमतीचे 1,200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
2) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-कुशावरती अशोक वडवराव, रा. मसला खु ता. तुळजापूर जि. धाराशिव या 21.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 900 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3) ढोकी पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरेापी नामे-मनीषा अशोक चव्हाण, वय 43 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव या 17.15 वा. सु. ढोकी ते तेर जाणारे रोडलगत येथे अंदाजे 1,600 ₹किंमतीच्या 20 लि. सिंधी ताडी जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-मालनबाई बप्पा चव्हाण, वय 43 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव या 18.15 वा. सु. ढोकी ते कळंब जाणारे रोडलगत अंदाजे 1,200 किंमतीची 15 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जनाबाई दिनकर चव्हाण, वय 43 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव या 18.15 वा. सु. ढोकी ते कळंब जाणारे रोडलगत अंदाजे 1,600 किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
4) भुम पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- शांताबाई लक्ष्मण पवार, वय 65 वर्षे, रा. शिवशंकर नगर भुम ता. भुम जि. धाराशिव या 14.15 आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,000 ₹ किंमतीच्या 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
5)कळंब पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- प्रकाश शहाजी काळे, वय 52 वर्षे, रा. एम.आय.डी.सी. रोड डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. डिकसळ जाणारे रोडलगत अंदाजे 36,500 ₹ किंमतीची 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 50 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-निता महादेव काळे, वय 35 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव या 17.05 इंदीरानगर कळंब येथे अंदाजे 8,750 ₹ किंमतीची 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 15 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- बाबासाहेब प्रकाश कांबळे, वय 36 वर्षे, रा. हंगरगा नळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. हंगरगा नळ शिवारात ता. तुळजापूर येथे अंदाजे 770₹ किंमतीच्या 11 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
7) आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- रेणुका प्रशांत तेलंग रा. चिलवडी ता.जि. धाराशिव हे 17.15 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 740₹ किंमतीचे 9 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एन.डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट.” धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्या गांज्या मुद्देमालाची त्यामध्ये. पोलीस ठाणे तुळजापूर येथील गुरनं 18/2013, 17/2013, 239/2021, पोलीस ठाणे बेंबळी गुरनं 18/2008, पोलीस ठाणे नळदुर्ग 23/2000, 35/2010, 28/2012, पोलीस ठाणे भुम 07/2015,149/2020, पोलीस ठाणे येरमाळा 01/2012, पोलीस ठाणे मुरुम गुरनं18/2016, पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं 11/2006, 21/2008, 18/2012, 302/2016 असे 7 पोलीस ठाण्याचा 15 गुन्ह्यातील एकुण 891.119 किलो ग्रॅम असा जप्त केलेला गांजा हा दि. 16.12.2023 रोजी 16.00 ते 18.00 वा. सु. पोलीस मुख्यालय धाराशिव येथील कवायत मैदान येथे मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.वासुदेव मोरे,उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ काया्रलय लातुर श्री.संतोष कुमार चव्हाण, नायब तहसिलदार धाराशिव श्री. घृष्णेश्वर स्वामी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र धाराशिव श्री.अशोक पवार त्यांचे सहकारी सय्यद अशपाक,अग्नीशामक दल येथील संभाजी साळुंके, भारत जगन्नाथ म्हस्के (मंडळ अधिकारी) सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, सपोफौ/504 काझी, पोलीस हावलदार औताडे, जावेद काझी, विनोद जानराव पोलीस नाईक- बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी फोटो ग्राफर- शेख, व्हिडीओ ग्राफर पोलीस अमंलदार -विठ्ठल गरड यांचे उपस्थिती सर्व कायदेशीर बाबीची पुर्तात करुन योग्य रित्या जाळून नाश करण्यात आला.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी