कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.खंडोबा देवाची यात्रा चंपाषष्ठी या दिवशी असते. त्यामुळे यावर्षीही यात्रा सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सुरुवात होत आहे. यात्रेला सुरुवात भल्या पहाटे ग्रामस्थ मंदिरापर्यंत दंडवत घेऊन होते यानंतर मानाचे नैवेद्य ,मानाच्या काट्या, नंगर मिरवणूक अगडबगडा मिरवणूक( दगडांच्या चाकाचा रथाच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा) मंदिरावर भंडारा खोबऱ्याची उधळण करणे अशा धार्मिक कार्यक्रमामुळे यात्रेला मोठी गर्दी असते यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८ डिसेंबर रोजी रात्री 09:00 वाजता तुझ्यात जीव रंगला लावण्याचा कार्यक्रम,दि १९ डिसेंबर रोजी सोंगे व रात्री स्थानिक कलावंतांचा मराठी नाटक वहिनी माझी माय माऊली,दि.२० डिसेंबर रोजी भव्य कुस्त्या, कुस्त्याचा कार्यक्रम तर रात्री लोकनाट्य तमाशा ,दि २१ डिसेंबर रोजी वाघ्या मुरळी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.तसेच यात्रा समितीच्या वतीने लेझीम पथक तयार केले असून. मागील 15 वर्षापासून राजे ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी यात्रा समिती अध्यक्ष चरणेश्वर पाटील व समितीतील सदस्य यांनी नियोजन केले आहे.मंदिराची रंगरंगोटी केली असून.विद्युत रोषणाई केली आहे.पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेत सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात