कळंब – विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना दिलेल्या ज्ञानाचे दृढीकरण होऊन विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते.विज्ञान प्रदर्शनामुळे विज्ञान व गणित विद्यार्थ्यांना अधिक सुलभ समजते असे मत ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ५१ व्या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके म्हणाले की, शालेय जीवनामध्ये मी पण विज्ञान प्रदर्शनामध्ये माझे प्रयोग सादर केले होते. याच शाळेमध्ये असताना माझ्या प्रयोगाला तालुक्यात पहिला नंबर मिळाला होता. विज्ञान प्रदर्शनामुळे शेती विषयी तंत्रज्ञान, औद्योगिक विषयक माहिती, नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपणास मिळत असते. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे प्रयोग सादरीकरण करायचे असते. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. त्यांना नवी दृष्टी मिळते. त्यांच्या भविष्यात येणाऱ्या नवनवीन गोष्टी त्यांना हाताळता येतात असे मत व्यक्त केले. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, मोहाचे माजी सरपंच रमेश मोहेकर, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कळंब पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते होते. यानीही अध्यक्ष समारोपामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जगताप यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख प्रशांत निनाळ, साधन व्यक्ती मैंदाड बी.जी. उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन माध्यमिक व प्रार्थमिक शाळा असे दोन गटात घेण्यात आले. माध्यमिक विभागातून एकूण ३२ शाळेने सहभाग घेतला. माध्यमिक गटातून हनुमान विद्यालय घारगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील शिवम गाडे या विद्यार्थ्याने क्लिनिंग मशीन हा प्रयोग सादर केला. तर द्वितीय क्रमांक छत्रपती संभाजी विद्यालय जवळा खुर्द येथील वेदांत रणखांब यांनी सादर केलेला वायरलेस पॉवर ट्रान्समिशने पटकावला. तृतीय क्रमांक ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथील समीक्षा मडके ने सादर केलेला स्मार्ट व्हिलेज या प्रयोगास मिळाला. प्राथमिक विभागातून एकूण ६६ शाळेने सहभाग नोंदवला. प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाना (आंबा) येथील अस्मिता गायकवाड हिने सादर केलेले जमीन विरहित शेती या प्रयोगाने मिळवला. तर द्वितीय क्रमांक ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथील अनुष्का मडके हिने सादर केलेला शाश्वत शेती या प्रयोगाला मिळाला. तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्रशाला ईटकुर येथील अर्चना शिंदे हिने सादर केलेले कडधान्य संतुलित आहार या प्रयोगास मिळाला. शैक्षणिक साहित्य गटातून फक्त एकच शिक्षकाने सहभाग नोंदवला. यामध्ये ज्ञान प्रसार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षिका नेता सोनवणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून प्रा. नंदकुमार टेकाळे, प्रा.युसूफ शेख, प्रा. बब्रुवान मोरे, प्रा. अमित जाधव, प्रा. जयंत भोसले, प्रा. अशोक नाडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गिड्डे केले तर आभार दिलीप पाटील यांनी मानले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात