August 9, 2025

मोबाईल टायपिंगच्या जमान्यात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा हा स्तुत्य व गरजेचा उपक्रम – प्राचार्य सतिश मातने

  • कळंब – आज विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी होत असून प्रत्येकाला मोबाईल टायपिंग करण्याची सवय लागल्यामुळे हस्ताक्षर स्पर्धा या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या काळात कळंब तालुका पत्रकार संघ व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समिती शाखा कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्या हा उपक्रम स्तुत्य आणि गरजेचा असल्याचे मत भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य तथा राजकीय कट्टाचे संपादक सतिश मातने यांनी व्यक्त केले.
    ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूल येथे ते बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते.
    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक विलास पवार होते तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका पाटील एस.डी,पर्यवेक्षक दिगंबर खामकर,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समिती कळंब अध्यक्ष सोपान पवार यांची उपस्थिती होती.
    पुढे बोलताना प्राचार्य मातने म्हणाले की, कळंब तालुका पत्रकार संघ हा नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उपक्रम साने गुरुजी कथामाला समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करून विद्यार्थ्यांना चांगले लेखनाचे व्यासपीठ निर्माण करून दिले त्याबद्दल देखील त्यांनी अभिनंदन केले.
    यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती अ गट पाचवी ते सातवी ब गट आठवी ते दहावी एकूण 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.(अ गट पाचवी ते सातवी) कुमारी मोनाली उत्तम भांगे प्रथम क्रमांक, उदय हरीश काळे द्वितीय क्रमांक, दर्शना सुशील गोंड तृतीय क्रमांक, (ब गट आठवी ते दहावी) कुमारी सावनी बालाजी अडसूळ प्रथम क्रमांक, कुमारी निकिता कालिदास वनवे द्वितीय क्रमांक, कुमारी अश्विनी सुनील वाघमारे तृतीय क्रमांक मिळविला.
    कार्यक्रमाची सुरुवात सई काळे,सिद्धी पवार यांच्या
    स्वागत गीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोपान पवार यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याभवन हायस्कूल मधील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!