August 9, 2025

उच्च शिक्षणासाठी भावेश वाहूळे जर्मनीस रवाना

केज ( विशेष प्रतिनिधी ) – केज तालुक्यातील मौजे सौंदना येथील भावेश भागवत वाहुळे हे नुकतेच जर्मनी येथे उच्च शिक्षणा साठी पात्र झाले आहेत. त्याबद्दल केज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व मांजरा विकास फाऊंडेशन संस्थेच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
भावेश भागवत वाहुळे यांनी बी. टेक मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून पुणे येथून पदवी प्राप्त केली आहे. ते पुढील शिक्षणासाठी जर्मनी येथे रवाना होणार आहेत. त्याबद्दल त्यांचा मौजे नायगांव येथील मांजरा विकास फाऊंडेशन संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मांजरा विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा केज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण खोडसे,प्रदीप मुळूक, सामाजिक कार्यकर्ते भीमराव वाहुळे,भागवत वाहुळे,प्रशांत खोडसे पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांच्यासह इतर नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!