कळंब – दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिना दिवशी कळंब येथील अनेक शासकीय कार्यालय कुलूप बंद असल्याचे निदर्शनास आले होते.याविषयी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी तक्रार दाखल करुण संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावर तहसीलदार यांनी कळंब शहरातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख यांना संविधान दिन साजरा केला किंवा कसे याचा फोटो सह स्वयंस्पष्ट अहवाल तात्काळ २ दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले होते. कळंब तहसीलदार याप्रकरणी कोणती कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. याप्रकरणी आता कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी या विषयी स्वता दखल घेऊन तहसीलदार यांच्या देखरेख खाली त्रीसदस्यीय समिती स्थापण केली आहे. समितीमध्ये चौकशी व नियंत्रण अधिकारी म्हणून कळंब तहसीलदार मनिषा मेने,चौकशी अधिकारी यांचे सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार राजेश तापडिया व चौकशी अधिकारी यांचे कामकाज पाहण्यासाठी नेताजी गायकवाड या अधिकारी यांची नेमणूक करून समिती मध्ये समावेश केला आहे.कळंब शहरात असलेल्या शासकीय कार्यालयांपैकी किती कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला नाही अशा सर्व शासकीय कार्यालयांची नावे व संख्या नमुद करुन चौकशी अहवाल ७ दिवसाच्या आत सादर करावा असे आदेश कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी त्रीसदस्यीय समितीला दिले आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात