मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.६ डिसेंबर २०२३ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक संभाजी गिड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आपल्या मनोगतातून प्राचार्य संजय जगताप यांनी महामानव बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक तसेच शैक्षणिक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन