August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • ‘नियमित प्रसिध्दी पत्रक’(प्रेस नोट) ‘शनिवार- दि.02.12.2023
  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.01 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 109 कारवाया करुन 65,300 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • भमु पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)ओंकार रेवननाथ कांबळे, वय 25 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव या दि.01.12.2023 रोजी 15.30 वा. सु. फाट्यावर हॉटेल बळीराजा समोरील मोकळ्या जागेत अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • परंडा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)अमोल कचरु भोसले, वय 31 वर्षे, रा. ईडा ता. भुम जि. धाराशिव हे दि.01.12.2023 रोजी 15.30 वा. सु. हॉटेल सातबारा ईडा ते जवळा रोड येथे अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • तामलवाडी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)शंकर मोतीराम चव्हाण, वय 32 वर्षे, रा. खडकी तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.01.12.2023 रोजी 17.30 वा. सु. खडकी तांडा येथे टपरीसमोर अंदाजे 960 ₹ किंमतीची 12 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.01.12.2023 रोजी 14.45 वा. सु. येरमाळा पो. ठा.बाजार मैदान दहिफळ येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रविकांत पांडुरंग धोंगडे, वय 38 वर्षे, रा. दहिफळ ता. कळंब जि. धाराशिव हे 14.45 वा. सु. बाजार मैदान दहिफळ येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 780 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.01.12.2023 रोजी 19.20 वा. सु. उमरगा पो. ठा.हद्दीत सुजाता हॉटेल समोर तुरोरी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सादिक बाबु जेवळे, वय 27 वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.20 वा. सु. सुजाता हॉटेल समोर तुरोरी येथे मुंबई मेन बाजार मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 750 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • आंबी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)महादेव अविनाश भोगील, वय 27 वर्षे, रा. दांडेगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.01.12.2023 रोजी 16.30 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा मॅझीक क्र एमएच 25 टी1085 हा जेकटेवाडी येथील चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये आंबी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) सागर राजेंद्र काटकर, 2) शुभम राजेंद्र काटकर, 3) शोभा राजेंद्र काटकर, सर्व रा. वाणेवाडी, ता. तुळजापूर यांनी दि. 29.11.2023 रोजी 12.30 वा. सु. वाणेवाडी येथे शेत गट नं 161 मध्ये फिर्यादी नामे-उमेश गणपती शिनगारे, वय 35 वर्षे, रा. वाणेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने बांधावरील दगड शेतात टाकण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने, मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- उमेश शिनगारे यांनी दि.01.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे : मयत नामे- व्यंकट हानमंत फुगटे, वय 46 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.30.11.2023 रोजी 05.30 वा. सु. बाबळसुर पाटीचे पुढे उमरगा ते लातुर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 5685 ही वर बसून जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 3673 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवुन व्यंकट फुगटे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात व्यंकट फुगटे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- विठ्ठल मारुती फुगटे, वय 45 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “अवैध मद्य विरोधी नळदुर्ग पोलीसांची कारवाई.”
  • मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दि.01.12.2023 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्नील लोखंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येडोळा व लोहगाव गावाचे हद्दीत गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टया सुरु आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर बातमीची हकीकत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख यांना माहिती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पथक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करुन छापा मारला असता, येडोळा व लोहगाव शिवारात इसम नामे- राजु धोंडीबा राठोड, वय 33 वर्षे, 2) संजय सिध्दु राठोड, वय 40 वर्षे, 3) जालींदर रेवण पवार, वय 50 वर्षे, 4) लक्ष्मी प्रकाश आडे सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सर्वजन 4,600 लि. गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे जवळ बाळगलेले मिळून आले. तसेच गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नाश करण्यात आला. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,31,300 ₹ असुन वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे गुरनं 550/2023, 551/2023, 552/2023 कलम 65(ई)(फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री गोहर हसन साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री निलेश देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे, सुरज देवकर, पोलीस उपनिरीक्षक संजय झराड, तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग पोलीस अंमलदार, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिवचे पोलीस निरीक्षक श्री. कवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मुंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पवन मुळे, यांचे पथकाने केली आहे.(सोबत छायाचित्र जोडले आहे.)
error: Content is protected !!