कळंब (जयनारायण दरक ) – सामूहिक शेततळ्यासाठी २० हजार रुपयेची लाज घेताना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील कृषी अधिकारी संतोष बाबुराव हुरगट यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजुर असलेल्या सामूहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक/प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी कळंब तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी संतोष बाबुराव हुरगट यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी करून २० हजार लाज घेतली. हुरगट यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरक्षक नानासाहेब कदम यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करूत असेल तर कार्यालय (०२४७२) २२२८७९ व टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन