August 9, 2025

नोकरीला हुलकवणी देत,आई व बहिणीचं सोनं मोडून दिव्यांगाची व्यवसायात उडी…

  • कळंब – बालवयातच पायाला दिव्यांगत्व अन नशिबी काठ्यांचा आधार यामधूनही या परिस्थितीत शिकूनही अपंगाच्या कोट्यातूनही नोकरीचा मेळ बसत नाही. मग उदरनिर्वाहासाठी व्यवसायाचा मार्ग चोखाळला तर भांडवलासाठी बँका दारात उभा राहू देत नाहीत. संकटाच्या या गर्तेत तो तरीही डगमगत नाही. काठीचा आधारावर आई अन् बहिणीचे सोने मोडून व्यवसाय थाटतो अन् त्यातच स्थिरावत इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देतो. ही कथा आहे कळंब येथील अशोक चंद्रकांत कुलकर्णी यांची. परिस्थितीशी दोन हात कसे करायचे, संकटावर मात करत उभारी कशी घ्यायची याचा वस्तुपाठ देणारी ही ४४ वर्षीय अशोकरावांची कथा धडधाकट व्यक्तींनाही ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहीजे असा संदेश देणारीच म्हणावी लागेल.
    मूळच्या खामसवाडी येथील अशोक यांचे बालपण आनंदात चालले होते. यातच एका आजारात त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. दिव्यांगत्व आल्याने काठीचा आधार – घेतल्याशिवाय पाऊल पडत नसे. – यातही त्यांनी गावातीलच जि.प. शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले तर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी कळंब गाठले. बारावी मोह्यात तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण कळंबच्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर
    महाविद्यालयात घेतले,घरची स्थिती जेमतेम,चार एकर कोरडवाहू जमीन, यात खायचे वांधे, यामुळे शिक्षण झाल्यावर नोकरीच्या शोधात काहीकाळ घालवला. पण, व्यवस्था काही मेळ लागू देईना. मग, महत्त्वाकांक्षी अशोकरावांनी एखादा व्यवसाय टाकून स्थिरस्थावर होण्याचा निर्णय घेतला. मात्र, बँका काही हातभार लावत नव्हत्या, शेवटी आई व बहिणीचे सोने मोडून काही भांडवल उभे केले व कळंब येथे झेरॉक्स व्यवसाय सुरू केला, चिकाटी अन् मेहनतीच्या बळावर आता ते रोजगारदाता बनले आहेत.
error: Content is protected !!