कळंब – शिंगोली ता.कळंब येथील रहिवाशी व बार्शी येथे वास्तव्यास असलेले अभय अच्युतराव माने पाटील ( ३७ ) यांचे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी बार्शी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील अच्युतराव माने पाटील कळंब तालुका eps-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व धाराशिव जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष व आई ,पत्नी दोन मुली ,एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २७ नोव्हेंबर रोजी बार्शी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघ व eps-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन